मनाने खूप छान वाटतेस,
ते तुझ्या डोळ्यात झलकलय…
अप्रतिम कलेची पारखी आहेस,
ते तुझ्या मनातून डोळ्यात वाहतंय…

ह्या डोळ्यात बराच काही लपलंय,
सांगायला हरकत नाही…
अंधारल्या रात्रीला तू घाबरतेस,
पण वाट पाहतेस फुलावी जुई…
कलेने भरलेली तुझी मूर्ती आहे,
उगाच बेचैन केलाय भूतकाळाने…
कुणास कधी फसवू नको,
क्षणात तडफडशील, कुणाच्या तरी दू:खाने…

भविष्याची चाहूल जर असेल तुला,
तर तुझ्या विश्वात मोगरा फुलेल…
स्वप्नांच्या दुनियेत जगतेस,
तेच अगदी तुझ्या डोळ्यात हसेल…

तुझ्या तीक्ष्ण नजरेचे तीर,
कुणाच्याहि हृदयात रुततील प्रिये…
खरं सांगतो, हि माझी कल्पना नाही,
ते घायाळ करतील कित्येक तरी हृदये…

तुझ्या डोळ्यात चमक आहे चांदण्यांची,
खूप हसतेस, बेभान वाऱ्यासारखी…
खरं हसू कुणी कधी पाहिलंच नाही,
मनात ते दडलंय, अगदी तू उगवत्या चांदणी सारखी…

– परेश पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *