नभी दाटले शब्द अनेक,
नभ गरजू पाहे!
विसाव्यास पहाडी सुंदर एक,
शब्द त्याचा तळाशी वाहे!
छान हिरवळ अक्षरांची,
सुंदर पाने झडलेली सारी!
वेळ होती मेघ बरसण्याची,
अंधूक प्रकाश पाहाडीवरी!
अवती भोवती इंद्रधनू राहे,
गंधीत रानाच्या क्षितीजावरी!
थेंब पाण्याचा अलगद वाहे,
पहाडीच्या सुंदर गालावरी!