पहिल्यांदाच असं कुणी एकांतात भेटलं
जे खरच मनात घर करून राहिलं
खरं सांगावं तर अचानक भेट झाली
पहिलाच असं कुणी जीवनाच्या प्रवासात भेटलं

न आवाज ऐकला कधी, न पाहिलं मी तिला
क्षितिजाच्या दूर राहूनही तीन घेरलं मला
शब्दात ती प्रेमाची व्याख्या काय करावी
अदृश्य राहूनही तिनं प्रेमात अडकवलं मला

हा खेळ निसर्गाचा कि धाव मनाची
पण हि वेळ सुंदर स्वप्नांच्या अल्लड प्रवासाची
कुणास ठाऊक काय असाव तिच्या मनात
तरीही डोळे उघडताच ती प्रीत माझ्या हृदयाची

फक्त स्वप्नातच जगायचं कि दृश्य विश्वात
काहीच न घडता “वेड्या तू गुंतलास कसा तिच्यात?”,
विचार तिला तू होशील का माझी रागिणी?
नाहीतर तुझे दिवस सरतील उगाच तिच्या आभासात

आत्ता तिलाच ठरवुदे  कि आपण कोण बिचारे
मी नदी तू सागर, कि एकाच सागराचे दोन किनारे…
ह्या आयुष्यत भेट होईल का आपली कधी?
उघडशील काय माझ्यासाठी तुझ्या हृदयाची द्वारे?

– परेश पाटील

1 thought on “प्रेम क्षितिजापलीकडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *