जे काही मागायचं असेल ते मागून घ्या
वेळ खूप कमी राहिली आहे
वेळ जाते निघून हातातून
आणि आठवणी राहतात जखम करून
ते सारं काही अचानक होतं
आणि मग आपणच रडतो हसून हसून
त्याच आठवणी पुन्हा पुन्हा
तेच शब्द वाजवितात वीणा
दूर कुठेतरी आग लागते
आणि हृदयात राहतात घर करून खुणा
आयुष्यात खूप काही हवं असतं
जे मिळायचं ते मिळून जातं
शेवट मात्र गोड असतो
तरीही स्वप्न अपुरं राहिलं वाटतं
एकवेळ अगदी मिळणार वाटतं
स्वप्नांच्या पुढे जावून हाती येतं
मिळण्याच्या आनंदात हरवून जातो
आणि मग अलगत ते मात्र निसटू लागतं
म्हणून म्हणतो: जे मागायचं असेल ते मागून घ्या
वेळ खूप कमी राहिली आहे….
– परेश पाटील