एखाद्या दिवशी सकाळी,
कॉलेजच्या सभोवती फिरावे…
न कळता निसर्गाच्या सहवासात,
आपण सर्व इथे रमून जावे…
अरे मित्र, त्या दिवशी,
नाही का? आपण फिरत होतो…
कॉलेजच्या समोरील मैदानातून,
कोलेजकडे झेपावत होतो…
तेव्हा ती… मुलगी किती सुंदर,
बसली होती कॉलेजच्या कट्ट्यावर…
मित्रा तुझ्याकडे पाहून ती हसत होती,
खळ्या पडल्या होत्या तिच्या गालावर…
जशी स्वर्गातून परी उतरली ती,
चमकत होती ती चांदण्याहून…
मित्रा मला तू खरा सांग,
ओळख होती काय तुझी पूर्वीपासून?
तू तिच्याकडे पुन्हा पाहता,
ती लगेचच पुस्तकात लपली…
आणि तेव्हा मनाशी हसून,
अचानक काहीतरी ती पुटपुटली…
मित्रा… तेव्हा तू मला म्हणालास,
‘तू ह्या मुलीवर कविता करू शकतोस!’
कविता काय करणार मी?
तिच कविता आणि तू कवी दिसतोस…– परेश पाटील
प्रकाशित: जून २००७