कधी कधी मला पाहून तू हसतेस
तुला मी जोकर वाटतो काय?
तर माझ्याकडे आश्चर्याने पाहतेस
दुरून मला तू खूप पाहतेस,
जवळ आल्यावर जमीन पाहतेस!
नजरेला नजर भिडवता येतं कि नाही
काय प्रेम करायला लाजतेस?
तशी तू खूप छान दिसतेस,
मला वाटतं तू माझ्यावर मारतेस!
पण मी एक विचारतो तुला,
खरच काय माझ्यावर प्रेम करतेस?
मला अश्या गोष्टीत आवड नाही,
पण तुझ्या वागण्यात मला वेडा करतेस!
तुझ्यासाठी चंद्र तारे आणणार नाही,
काय तू हे मान्य करतेस?
जेव्हा मी विचारेन तुला,
तेव्हा तू ‘हो’ म्हणू शकतेस!
‘नाही’ म्हणालीस तरीही हरकत नाही,
पण मला वाटेल तू मला फसवतेस!
एवढा विचारतोय मी तुला,
अजून कसला विचार करतेस?
चालेल तू भरपूर विचार कर, पण…
तोंडावरून रुमाल फिरव, घामाने भिजतेस!
ह्या आयुष्याच्या गोष्टी आहेत,
याचा विचार करायलाच पाहिजे!
आत्ता मला तर वाटत आहे,
तू मला मनापासून पसंद करतेस!
अरे! पुन्हा… तू हसतेस!
तुला मी जोकर वाटतो काय?
तर माझ्याकडे आश्चर्याने पाहतेस…
-परेश पाटील