खूप काही सांगते माझी आई
काय आणि किती गाऊ तिची गुणगाई
ती बोलते, बोलतोस तू किती कमी,
आणि राजा लिहतोस जास्त!
मनातलं बोलत जा जरा,
उगाच नको बसू स्वस्थ!
ती म्हणते, एवढा हुशार आणि शहाणा तू
उगाच कशाला डोळ्यात तुझ्या पाणी ?
लोकांचं मनाला नाही लावायचं वेड्या,
मला माहित आहे ना तुझी कहाणी..
ती विचारते, स्वतः समजू शकतोस ना तू?
मग कुणाची गरज काय तुला?
तीरासारखे शब्द आहेत ना तुझे,
मग गाफील राहतोस कशाला?
ती सांगते, तुला आहे माझा आशीर्वाद,
आणि वडिलांचा पाठीवर हात!
गाढून टाक एकदाचे अटकेपार झेंडे,
नंतर बघ कडकडतील लोकांचे दात!
– परेश पाटील